परभणी, (प्रतिनिधी)- अमली पदार्थ विरोधी भव्य जनजागृती सायकल रॅली आज सकाळी परभणी शहरात काढण्यात आली. परभणी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित या रॅलीचा शुभारंभ पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरू करण्यात आलेल्या या रॅलीत स्वतः पालकमंत्री मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सहभागी झाले होते.

युवकांचे आरोग्य, त्यांचा उत्साह आणि त्यांच्या आयुष्याचा उज्ज्वल प्रवास हाच आपल्या समाजाचा खरा आधार आहे. नशामुक्त समाजासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूयात, असे आवाहन यावेळी पालकमंत्री यांनी केले व त्यांनी उपस्थित सर्वांना अमली पदार्थ विरोधीची शपथ दिली.

रॅलीत अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, डॅा.केदार खटींग आदींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.
***


