खलात उतरून केली पाहणी
परभणी ( प्रतिनिधी) परभणी शहरात मागील 48 तासापासून अनेक वसाहतींमध्ये पाणी साचून राहिले आहे आणि घरांचे नुकसान झाले आहे या सर्व नागरिकांना तातडीने मदत करा अशा सूचना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पाहणी दरम्यान दिल्या.
परभणी शहरातील जमजम कॉलनी,गाडगेबाबा नगर, सहारा कॉलनी, सागर कॉलनी, बाबर कॉलनी शाहू नगर, लक्ष्मी नगर,आदी भागात मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले आहे. सलग 48 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी जाऊन अन्नधान्य कपडे आधी साहित्याची नासधूस झाली आहे या सर्व नुकसानीची पाहणी शनिवारी आमदार डॉ.पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना धीर दिला ज्या नागरिकांचे नुकसान झाले अशा सर्वांना तातडीने आर्थिक मदत आणि अन्नधान्य पुरवा अशा सूचना महानगरपालिका आणि तहसीलदारांना केल्या. नागरिकांनी तातडीने आपले आधार कार्ड बँकेचे पासबुक झेरॉक्स मनपा आणि तहसीलदार यांच्याकडे द्याव्यात अशा सूचना केल्या यावेळी तहसीलदार संदीप राजपुरे, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, यांच्यासह मंडळ अधिकारी राठोड, रवींद्र पतंगे, प्रशास ठाकूर, बाळराजे तळेकर, शुभम हाके,प्रशांत सवंडकर, बंडू बिडकर शिवाजी चोपडे, संदीप झाडे, वाहिद खान,तुराब खान,अशोक गव्हाणे,सचिन कांबळे, असलम खान आदी उपस्थित होते.
….चिखलात उतरून केली पाहणी …
शहराच्या अनेक भागात सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे आमदार राहुल पाटील चिखलात उतरून अनेकांच्या घरात पाहणी केली तातडीने या सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवा यापुढे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करा अशा सूचना त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या.
… पंचनामाची गरज काय थेट मदत करा ..
ग्रामीण भागात शेत शिवारात प्रचंड नुकसान झाले आहे जे नुकसान डोळ्याने दिसते त्याच्या पंचनाम्याची गरज काय ? चार वेळा अतिवृष्टी झाली, कुठेही पिके शिल्लक राहिली नाहीत अशावेळी पंचनाम्यात वेळ का घालता एनडीआरएफच्या निधीची वाट कशाला पाहता राज्य सरकारने आपली तिजोरी उघडावी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत तात्काळ करावी अशी मागणी यावेळी आमदार पाटील यांनी केली.


