परभणी (प्रतिनिधी) बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालातून बिहारसह देशभरातील जनतेचा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना जनतेने ठाम नाकारत, विकासाच्या राजकारणाला कौल दिला आहे.
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांतदेखील हाच विश्वास उमटेल, असा ठाम विश्वास स्थानिक नेतृत्वाने व्यक्त केला. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि महाराष्ट्र निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा विकासाच्या राजकारणाला बळ देत यशाची परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास वर्तविण्यात आला.
आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय नितीशजी यांच्या नेतृत्वात भव्य विजय मिळवणाऱ्या भाजपा-प्रणित सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात पार पडला. पालकमंत्री .सौ. मेघनादीदी बोर्डीकर, माजी मंत्री आ सुरेशराव वरपुडकर, आयोजक भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे आणि सुरेश भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फटाक्यांच्या रोषणाईत, बँड-बाज्यांच्या निनादात आणि एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. शहरभरात या विजयाचा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.


