परभणी (प्रतिनिधी) : परभणी जिल्हास्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धेत वसंत अनु. जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, कारेगाव, ता. जि. परभणी येथील 14 वर्षांखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत दिमाखदार विजय मिळवला. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांघिक खेळ, जिद्द, चिकाटी आणि क्रीडाकौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत हे यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतरावजी धाडवे साहेब, संस्था सचिव प्रवीण भैय्या धाडवे, प्राथमिक मुख्याध्यापक परसराम जाधव आणि माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती गीता लेडे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
याप्रसंगी शिक्षक जी. ए. मुडे, एस. बी. काळे, एस. टी. इंगळे, पी. के. राठोड, जी. टी. निर्वळ, आर. व्ही. जुनघरे, व्ही. एन. मोपकर, आर. के. गारकर, ए. एस. रेडेवार, एस. डी. कच्छवे, एस. व्ही. रोडे, एम. पी. कराळे, एस. एन. शिंदे, व्ही. डी. खिराडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. निलेश यादव यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली असून, विभागीय स्पर्धेतही विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन व विभागीय स्पर्धेसाठी पुढील वाटचालीस दिल्या


