परभणी ( प्रतिनिधी) शहरातील क्वीन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी यासीन मुजफ्फर खान याने भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नेपाळ येथे आयोजित अकराव्या विंडो आंतरराष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाच्या अंडर-१५ गटातून खेळत त्याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले.
यासीन खानच्या या यशामुळे परभणी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे भारतीय संघाने स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली. या यशाबद्दल परभणी क्वीन्स इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका सय्यद अर्शिया मॅडम. फुटबॉल टीचर कोच सय्यद शकील सर
.शिक्षक, विद्यार्थ्यांसह क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले.
यासीनच्या या यशामागे त्याचे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्याच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून भविष्यातही तो भारतीय फुटबॉलमध्ये मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Tuesday, August 4
ताज्या बातम्या:
- परभणीच्या. गोल्ड मेडलिस्ट यासीन खान मुजफ्फर खानची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सुवर्ण कामगिरी
- 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण; हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी विविध विभागांना सूचना
- नांदेड रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; एका दिवसात 1,087 प्रकरणे, सुमारे सहा लाखांचा दंड वसूल : 29 गाड्यांची तपासणी
- दर्गा रोड परिसरातून पाच गायींसह वासरू चोरट्यांनी केले लंपास : कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
- अवघ्या सहा तासांत घरफोडीचा छडा; दोन सराईत चोरटे जेरबंद : पिंगळीतील 2 लाख 9 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत; ताडकळस पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत 20 हून अधिक तंत्रज्ञांचा वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेत प्रवेश
- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
- बेपत्ता तरुणीची माहिती देण्याचे आवाहन


