परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील युवा कुस्तीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते पैलवान संतोष उर्फ अमोल सोनाजी मोरे यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या परभणी जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांनी नुकतीच ही घोषणा केली.
पैलवान मोरे यांनी कुस्ती क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी परभणी येथे जगदंब कुस्ती संकुल उभारण्याचा संकल्प साकारत जिल्ह्यातील पारंपरिक कुस्तीला नवी दिशा देण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निकाली कुस्त्यांच्या भव्य मैदानांचे आयोजन केले जाते. तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. याशिवाय होतकरू पैलवानांना खुराकासाठी मानधन व आर्थिक मदत देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही ते करत आहेत.
परभणी जिल्ह्यात अधिकाधिक गुणवंत पैलवान घडावेत, कुस्तीची परंपरा अधिक समृद्ध व्हावी आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील कुस्तीपटू, क्रीडाप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Tuesday, September 15
ताज्या बातम्या:
- शुभम मस्केची सुरेल भरारी; ‘सा रे ग म प’मध्ये परभणीच्या युवा गायकाची टॉप-१२ मध्ये धडक
- कै. प्रा. शंकर गंधम सर स्मृती राज्य रस्सीखेच स्पर्धा उत्साहात संपन्न; लातूर, ठाणे, बुलढाणा व मुंबई ,नांदेड़ जिल्हा अव्वल स्थानी
- डॉ. संदीप चव्हाण यांची ग्राहक संरक्षण परिषदेत अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती
- जी-1 हॉस्पिटल येथे दि 29 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
- वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
- आनंदराव भरोसे यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्याच्या सभामंडपाचे भूमिपूजन
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर


