परभणी,(प्रतिनिधी) : ऊस उत्पादक शेतकर्यांच्या थकीत रकमेसह नवीन दरासंदर्भात निश्चितपणे दिलासादायक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी सात दिवसांपासून सुरु असणारे धरणे आंदोलन मंगळवारी मागे घेतले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स इंडस्ट्री अंतर्गत ऊस उत्पादक शेतकर्यांना 300 रुपये वितरित करण्यासह नवीन दरा संदर्भात कारखाना प्रशासनाने निर्णय घ्यावा या मागणीकरीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या सात दिवसांपासून लाक्षणिक धरणे आंदोलनास बसले होते. पोलिस प्रशासनाने मध्यस्ती केल्यानंतर आमदार डॉ. पाटील यांनी मंगळवारी या आंदोलनकर्त्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली, त्यांच्याबरोबर हितगुज केले. तसेच ऊस उत्पादक शेतकर्यांना 300 रुपये वितरित करण्यासह ऊसाच्या दरासंदर्भात बॉयलर प्रतिपदन कार्यक्रमात निश्चित योग्य निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन दिले. कारखाना सर्वांचा आहे, मी केवळ कारखान्याचा रखवालदार आहे, असे नमूद करीत आमदार पाटील यांनी हा कारखाना सुस्थितीत येऊ द्या, श्वास घ्यावयास थोडा वेळ द्या, आपण हा कारखाना चांगल्या पध्दतीने उभा करु व ऊस उत्पादकांना अधिकाधिक लाभ कसा मिळेल, या दृष्टीने हिताचे निर्णय घेऊ, असे म्हटले.
आपण जिल्हावासीय आहोत, इथेच आपण राजकारण आणि समाजकारण करत आलो आहोत, करत राहु. विशेषतः या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने प्रयत्नरत राहु, या कारखान्याच्या माध्यमातून आपण कधीही एक रुपयाही नफा कमविला नाही, कमविणारसुध्दा नाही. आपण ऊस उत्पादक शेतकर्यांच्या विकासाच्या दृष्टीनेच सातत्याने प्रयत्नरत राहु, अशी ग्वाहीही दिली.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आमदार पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आपले धरणे आंदोलन स्थगित केले.
Tuesday, October 13
ताज्या बातम्या:
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या आश्वासनानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माधव नगर विभागाचा 24 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अक्षय देशमुख यांची निवड
- राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविणार; संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी; चारा जतन, प्रक्रिया व उत्पादनावर भर
- दिवाळीत गड-किल्ल्यांच्या ‘दुर्गोत्सव २०२६’ मध्ये सहभागी व्हा!- दि. 5 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीची सुविधा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- ॲग्रीव्हिजनच्या १०व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी परभणीच्या ओमकार डोके, समीक्षा सुतार आणि सिद्धी काशीकर या तिघांची निवड; राष्ट्रीय व्यासपीठावर परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
- नांदेड रेल्वे विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 5.25 लाखांची वसुली : दोन दिवसांत 562 प्रकरणे उघड


