परभणी,(प्रतिनिधी) : परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 900 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

लांब उडी, भालाफेक, गोळाफेक आणि धावणे अशा विविध मैदानी स्पर्धांचा यात समावेश होता. स्पर्धेचे उद्घाटन सहआयुक्त सागर शेजुळ, गजानन जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत आणि महापालिकेचे क्रीडा विभागप्रमुख नजम खान यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. अनिल मैड, कैलास ठेहरे, डॉ. पंडित, प्रा. राजू रेंगे, आदित्य गायकवाड, अमरदीप हत्तीअंबीरे, पप्पू हत्तीअंबीरे, शिवाजी खुणे, बालाजी मानोलीकर, सूर्यभान आणि दीपाली मुदगलकर यांनी काम पाहिले.


