परभणी ( प्रतिनिधी) दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत परभणी येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. माधवराव एकनाथराव भोसले यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. या उपक्रमातून त्यांनी सामाजिक संवेदनशीलतेचा आणि जनहिताच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
अॅड. माधवराव भोसले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी अॅड. माधवराव भोसले, अॅड. राजेंद्र रसाळ नांदापुरकर, अॅड. नितीन भोसले, अॅड. अभिषेक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. दुष्काळाच्या संकटात गरजू नागरिकांना मदत मिळावी आणि समाजातील विविध घटकांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा संदेश आहे. अॅड. माधवराव भोसले यांच्या या योगदानाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
Friday, October 23
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्ह्यात दुपारी 4 वाजेपर्यंत 61.81 टक्के मतदान :26 हजार 684 मतदारांपैकी 16 हजार 482 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; उपजिल्हाधिकार्यांची माहिती
- अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सेलूतील अभिनव फूड प्रॉडक्ट्स आणि परभणीतील के. के. बेकर्सचा परवाना निलंबित
- लग्नास नकार देणार्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करणार्या आरोपीला 3 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
- लातूरात वाळू, मटका व जुगार अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या धाडी; 18 इसमांविरुद्ध कारवाई, 62 लाखांचा मुद्देमाल जप्त
- दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अॅड. माधवराव भोसले यांच्याकडून लाख रुपयांची मदत
- जलपुनर्भरणासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
- आधार प्रमाणीकरणासाठी चौथी यादी प्रसिद्ध; २ हजार ९८६ शेतकऱ्यांचा समावेश; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश


