परभणी, (प्रतिनिधी) – मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी तर्फे परभणी, हिंगोली जिल्हयाकरीता व जिल्हयातील तालूका न्यायालय येथे कलम १३८ Negotiable Instrument Act अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता दिनांक २१ नोव्हेंबर२०२६ रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
कलम १३८ Negotiable Instrument Act अंतर्गतची प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करून विशेष लोकअदालतमध्ये ठेवावे. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी किंवा तालूका विधी सेवा समिती यांचेकडे अर्ज करावा.
सदर विशेष लोकअदालतमध्ये प्रलंबित असलेले कलम १३८ Negotiable Instrument Act प्रकरणे ठेवून तडजोडीअंती निकाली काढण्याचे आवाहन अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, परभणी श्री.आर.एम. सादराणी, यांनी केले आहे.
***


