परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या कल्याण मंडपम्जवळील आरोग्य केंद्र परिसरात कोविडच्या काळात मोठा गाजावाजा करीत सुमारे 40 लाख रुपये खर्चून उभारलेल्या ऑक्सीजन प्लांटच्या एकूण एक वस्तू गायब झाल्यानंतरसुध्दा महापालिका प्रशासनाने या चोरीबाबत अद्यापपर्यंत पूर्णतः अर्थपूर्ण मौन बाळगल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या संतप्त सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. या प्रकरणात तातडीने संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
करोनाच्या आपत्तीत मनपाच्या आरोग्य केंद्रात महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत करोनाच्या रुग्णांकरीता ऑक्सीजन प्लांटची उभारणी केली. त्यासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च केले. परंतु, करोनाचे वातावरण निवळल्यानंतर या ऑक्सीजन प्लांटचा त्याच ठिकाणी सद्उपयोग होईल, असे अपेक्षित असतांना या केंद्र परिसरातील ऑक्सीजन प्लांटचे एक एक करीत सर्व साहित्यच अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः लंपास केले. सुमारे 40 लाख रुपयांचे हे साहित्य गायब झाल्यानंतरसुध्दा महापालिकेंतर्गत आरोग्य विभागातील साखरझोपेत असणार्या वैद्यकीय अधिकार्यांनी त्याबाबत काडीचेही गांभीर्य दाखविले नाही. त्याचा परिणाम अज्ञात व्यक्तींविरोधात साधा गुन्हा सुध्दा दाखल झाला नाही. यामुळेच भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेंतर्गत सदस्य व नेते कमालीचे भडकले आहेत. नगरसेवक रितेश झांबडे, डॉ. केदार खटींग, विश्वजित बुधवंत, गणेश टाक, अद्वैत पार्डीकर, सौ. गिरीजा आजेगांवकर, वैशाली दैठणकर, निर्मला वाघमारे, सुशिला थोरात, सौ. सपना जुकटे व सौ. मीना वरपुडकर यांनी मंगळवारी महानगरपालिकेचे आयुक्त व महापौरांना एक निवेदन सादर करीत सुमारे 40 लाख रुपये खर्चून उभारलेल्या ऑक्सीजन प्लांटच्या वस्तू कुठं गायब झाल्या, असा सवाल केला. या प्रकरणात एकूण एक वस्तू चोरीस गेल्यानंतरसुध्दा गुन्हे न दाखल झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. या प्रकरणात महापालिका प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावेत व संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा या महापालिका सदस्यांनी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाद्वारे कारवाई न झाल्यास भक्कम असा पाठपुरावा करीत मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा या सदस्यांनी दिलासाशी बोलतांना दिला.
Tuesday, October 27
ताज्या बातम्या:
- परभणीत दरोड्याची तयारी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ४.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- परभणीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ उत्साहात साजरा: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पुढाकार
- सुमारे 40 लाख रुपयांच्या ऑक्सीजन प्लांटच्या चोरीबाबत महापालिका प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन ः भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांद्वारे तीव्र आक्षेप
- ऊस बिलाच्या थकीत दुसर्या हफ्त्याकरीता गंगाखेडात 2 नोव्हेंबर रोजी मोर्चा
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला वितरित होणार; राज्यातील ९१.१३ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १,८३५ कोटी रुपये जमा होणार
- मराठी भाषेचे संवर्धन करणे ही समाजाची जबाबदारी – डॉ. किरण कुलकर्णी : सेलूतील अक्षर व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद
- बुद्ध भीम गीत गायन स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद
- मराठी भाषा तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची वालूर, हतनूर येथील ऐतिहासिक स्थळांना भेट


