परभणी,(प्रतिनिधी)विद्यमान जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे 31 ऑक्टोंबर रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे परभणीच्या जिल्हाधिकारीपदी अण्णासाहेब चव्हाण यांची राज्य सरकारने नियुक्ती केली असून ते 31 ऑक्टोंबर रोजी पदभार स्विकारणार आहेत.
विद्यमान जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे 31 ऑक्टोंबर रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या रिक्तपदी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी मुंबई येथील मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमरानीकर यांनी या संदर्भातील परिपपत्रक गुरुवारी जारी केले आहे.


