परभणी (प्रतिनिधी) दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे नांदेड–हडपसर–नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
गाडी क्र. 07607 नांदेड–हडपसर : हि गाडी दिनांक 06 नोव्हेंबर 2026 (शुक्रवारी) रोजी नांदेड येथून सकाळी 06:50 वाजता सुटून पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, येडशी, धाराशिव, पांगरी, बार्शी, शेंद्री, कुर्डूवाडी, केम, जेऊर, कित्तूर, भिगवण आणि दौंड मार्गे त्याच दिवशी रात्री 22 :05 वाजता हडपसर येथे पोहोचेल. (1 फेरी)
गाडी क्र. 07608 हडपसर–नांदेड : हि गाडी दिनांक 06 नोव्हेंबर 2026 (शुक्रवारी) रोजी हडपसर येथून रात्री 23:40 वाजता सुटून आली त्या मार्गाने दुसऱ्या दिवशी दिनांक 07 नोव्हेंबर 2026 (शनिवारी) रोजी दुपारी 02:00 वाजता नांदेड येथे पोहोचेल. (1 फेरी)
या विशेष रेल्वेगाडीला प्रथम श्रेणी वातानुकुलीत शयनयान, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत शयनयान, सामान्य श्रेणी वातानुकुलीत शयनयान व सर्वसाधारण अशे एकूण 20 डबे असतील. प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा.
प्रवाशांना या विशेष रेल्वेगाडीमुळे अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.


