परभणी,(प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या परभणी शहर व ग्रामीण जिल्हा शाखेच्या नेतेमंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.04) परभणीत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवुन आनंदोत्सव साजरा केला.
परभणी शहर महानगर शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मनोज देशमुख, व्यंकटेश कुलकर्णी, अॅड. मिलींद भोगांवकर, श्रीकांत कुलकर्णी, बाबाराव नाईक, शशी पाते, विवेक मुसळे, राहुल काळे, जीवा जाधव, रामुअण्णा देशमुख आदींनी जूना पेडगाव रस्त्यावरील वसाहतीत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
मध्यवस्तीतील गव्हाणे चौकात भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. केदार खटींग, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, माजी नगरसेवक राजेश देशपांडे, प्रशांत पार्डीकर, अजित पटेल, प्रदेश कार्यकारणी सदस्य मोहन कुलकर्णी, अब्दुल बारी, मनोज डावरे, अॅड. गणेश जाधव, अनुप शिरडकर, दिनेश नरवाडकर, प्रभावती अन्नपूर्णे, अनंता गिरी, संजय रिझवानी, रितेश जैन यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.


