परभणी (प्रतिनिधी) काल मंगळवारी दि 10 दुपारच्या सुमारास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका माथेफिरू ने केल्यानंतर आज बुधवार दि 11 रोजी आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला मात्र दुपारनंतर हिंसक वळण लागले.

बुधवारी परभणीत बंद पुकारण्यात आला होता. मात्र सकाळी सुरू असलेले हे आंदोलन दुपारनंतर अचानक हिंसक झाले. जमावाच्या एका गटांनी अचानक दुकानावर वाहनांवर दगडफेक करत जाळपोळीचे प्रकार केले. शहरातील विसावा कॉर्नर येथे दुकानावर ठेवलेले पाईप व टायर्स या आंदोलकांनी जाळले. त्यानंतर त्या आंदोलकांनी दुकानांवर आपले लक्ष वेधत दुकानाच्या लावलेल्या पाट्या तोडण्यात तसेच दुकानावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.यावेळेस आंदोलकांनी तुफान दगडफेक केली या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला मात्र हे आंदोलन थांबत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुराचा नळकांड्या फोडल्या. पोलीस आणि आंदोलन यावेळेस आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले. या प्रकरणातील आरोपीची कसून चौकशी करून यामागे कोण सूत्रधार आहे हे तपासावे या मागणीसाठी हे आंदोलन यावेळेस करण्यात आले आहे.
सध्या पोलिसांनी सर्व शहरावर ताबा घेतला असून आंदोलकांना पांगवण्याचे काम सुरू आहे. तर अग्निशमन दल देखील घटना स्थळी जाऊन आग विजवली. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे असून प्रशासनाच्या वतीने जनतेला शांततेचे तसेच अफवांवर विश्वास ठेवुनये असे आवाहन करण्यात आले आहे तर शहरात कलम 163 लागून करण्यत आले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. ( छाया- उत्तम बोरसुरीकर)


