पालम (प्रतिनिधी) इदापूर येथे पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. यात परभणी जिल्हा कार्यकारणी घोषीत करण्यात आली आहे.महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवक आघाडी जिल्हा अध्यक्षपदी माधव निवृतीराव हत्तीआंबिरे पालमकर यांची निवड करण्यात आली आहे.
तर जिल्हाउपाध्यक्ष कपिल पांडुरंग हत्तीआंबिरे,जिल्हा सचिव शेख सलमान, जिल्हा महासचिव तुषार तानाजी पंडित, जिल्हा संघटक वसंत मस्के व सटवाजी थिटे यांची निवड करण्यात आली यावेळी समाज कार्यकृते विलास गेंदे, सिद्धार्थ सूर्यवंशी,आकास कस्तुरे,राहुल ससाने, गौरव शेळके आदि उपस्थित होते हि निवड महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांनी एका नियूक्ती पत्रा द्वारे केली आहे. या पत्रात पक्ष व पक्षश्रेष्ठीनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून शिस्तीचा आदर्श जोपासावा, पीडीत व अन्याय ग्रस्त जनतेच्या समस्या सोडविण्या साठी वेळोवेळी आंदोलनाची भुमिका घ्यावी. युवक यांच्यामध्ये नेतृत्व गुणांना विकास करून पक्षाला नविन नेतृत्व लाभावे अशी कार्यप्रणाली असावी सदर पदाचा कालवधी हा एक वर्षाचा राहिल असे सांगण्यात आले आहे या निवडी बदल सर्व कार्यकारणीचे जिल्हातून अभिनंदन होत आहे.


