परभणी, ( प्रतिनिधी) परभणी येथील आर.पी हॉस्पिटल आणि परभणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये परभणी शहरातील प्रथम देहदानाची नोंद झाली. देहदान चळवळीत काम करणारे विनोद डावरे यांच्या समुपदेशाने शहरातील एका नागरीकाने आपल्या भावाच्या निधनानंतर देह परभणी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ,परभणी वैद्यकीय विद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाला , वैद्यकीय विद्यार्थांना शिक्षणासाठी उपयोगी यावा यासाठी ,महाराष्ट्र ॲनाटोमी ऍक्ट अंतर्गत दान दिला.
मृत्युनंतर ताक्ताळ देहदान केल्याने इतरांना अवयव मिळतात.तसेच वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र विभागाला , वैद्यकीय विद्यार्थांना शिक्षणासाठी उपयोग होतो त्यामुळे नव्याने सुरु झालेल्या आर.पी हॉस्पिटल आणि परभणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथमच एका कुटुंबातील सर्व नातेवाईक यांच्या इच्छेनुसार कुटुंबातील मृतक व्यक्तीचा देह महाविद्यालयाला दान दिला.
हे कार्य विनोद डावरे यांच्या मार्फत झालेले आहे. आतापर्यंत श्री विनोद डावरे यांनी एकूण दहा देहदान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत.त्यांनी परभणी वैद्यकिय महाविद्यालय आणि आर पी हॉस्पिटल पाथ्री रोड परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती सुरू केली आहे.
आपल्या मृतक भावाचा देहदान करणाऱ्या भावाचे व संपूर्ण कुटुंबाचे परभणी वैद्यकीय महाविद्यालय व आर.पी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.जयदेव उघाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमीर तडवी ,प्रशासकीय अधिकारी गुणवंत अहिरे व महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख यांनी सदरील कुटुंबाचे आभार मानले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


