पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व पोलीस पाटील,शांतता समिती सदस्य, नगरसेवक, पत्रकार व छ.शिवजयंतीचे पदाधीकारी यांना कळविण्यात येते की दि. 13/02/2025 रोजी 2 वाजता. पोलीस पालम येथे नविन कायद्याचा प्रचार व प्रसार व शिवजयंती उत्सव या अनुशंगाने बैठक आयोजीत करण्यात आली आहे.
मा.उपविभागीय पोलीस अधीकारी डाॅ.समाधान पाटील व जेष्ठ विधिज्ञ श्कुलकर्णी , सूर्यकांत फड पालम न्यायालय हे मार्गदर्शन करणार आहेत..तरी सर्व पोलीस पाटील व सन्माननीय सदस्य यांनी तहसिल कार्यलयाच्या सभाग्रहात बैठकीस हजर राहून प्रशासनास सहकार्य करावे.असे पालम पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी केले आहे.


