पालम (प्रतिनिधी )अलीकडील काळात भारतात कॅन्सरसारखा रोगाचा वेगाने प्रसार होत आहे. ते होण्याची वयोमर्यादा ही कमी होत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कॅन्सर विषयीची भीती कमी झाली पाहिजे. स्त्रियांमध्ये व्यसनामुळे होणारे आजाराचे प्रमाण कमी आहे. परंतु पुरुषांमध्ये व्यसनाधीनतेमुळे कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सर विषयी भीती न बाळगता , डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेत उपचार घेतल्यास आजार बरा होऊ शकतो. प्राथमिक लक्षणे दिसताक्षणी आपण तपासणी करून घेतल्या पाहिजे. ग्रामीण भागात अजूनही लक्षणे दिसत असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शेवटी डॉक्टरांच्या हाताच्या पलीकडे परिस्थिती गेल्यावर रुग्ण बरे होऊ शकत नाहीत. त्यामुळे वेळेतच लक्षणे समजून आल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे प्रतिपादन कॅन्सर जनजागृती शिबिरात बोलताना डॉ. श्रीपाद कौसडीकर यांनी केले.
पालम येथे सौरभ जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कॅन्सर जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामेश्वर नाईक हे होते तर डॉ. केदार खटिंग यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. सुप्रसिद्ध कॅन्सर रोगतज्ञ डॉक्टर श्रीपाद कौसडीकर यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी डॉ, मनोज मोरे , माणिकराव केरवाडीकर , श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील जाधव आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. कौसडीकर म्हणाले की, ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहे. त्यावर प्रतिबंध म्हणून नऊ ते सोळा वर्षाच्या वयोगटातील मुलींसाठी लस उपलब्ध झाली आहे. जर ही लस दिली तर हा आजार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींना ही लस द्यावी.
उद्घाटनपर भाषण करताना डॉ. केदार खटींग म्हणाले की,
या आजाराची गंभीरता लक्षात घेऊन आपण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. योग्य दिनचर्या , सकस आहार व व्यायाम या गोष्टी नियमित करणे गरजेचे आहे. किमान यामुळे आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो.
अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर रामेश्वर नाईक म्हणाले की, सौरभ जावध चॅरिटेबल ट्रस्ट हे भविष्यात कॅन्सर सारख्या रोगाची जनजागृती करणारे महत्त्वाचे केंद्र बनेल. समाजात आरोग्य विषयक जागृती करणाऱ्या अशा सामाजिक संस्था उभा राहणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन गोविंद शिंदे यांनी केले. तर आभार प्राचार्य कामाजी जाधव यांनी मानले.
Saturday, August 22
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


