पुणे (प्रतिनिधी) प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘जागृती महिला व बालकल्याण संस्थेच्या’ वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ गुरूवार दिनांक २४ जुलै २०२५ रोज सायंकाळी ०५.३० ते ०८.०० ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृह’ , पुणे-सातारा रोड, बिबवेवाडी, पुणे. येथे आयोजित केला आहे.
यावेळी सन् २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी (१० वी) आणि बारावी (१२ वी) च्या जाहीर निकाल पत्रात ८० % च्या वर गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी, ज्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी मध्ये सन् २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षीच्या जाहीर झालेल्या निकाला नुसार ८०% च्या वर गुण मिळाले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांची यासाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे . तरी, आपणही आपल्या अवतीभवतीच्या परिसरातील ८०% च्या वर गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमाबाबत जरूर सूचित करावे, आणि त्या सर्वांना उपरोक्त समारंभात, अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या मार्कलिस्टची झेरॉक्सची एक प्रत, तसेच ओळखपत्र (आधारकार्ड)ची एक झेरॉक्स प्रत, समारंभापूर्वी म्हणजेच, शक्यतो किमान, दिनांक 15 जुलै पूर्वी, सदर संस्थेच्या कार्यालयात, म्हणजेच, “जागृती महिला व बालकल्याण संस्था, (रजि.), रोहित अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ८, सर्व्हे क्रमांक १५, १६/२, समर्थ पार्क जवळ, अभिनव शाळे समोरील लेन, GTPL ऑफिस जवळ,आनंद नगर, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे – ५१) येथे जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


