परभणी (प्रतिनिधी) 21 सप्टेंबर 2025 रोजी महाराजा अग्रसेन जयंती निमित्त अग्रवाल डॉक्टर असोसिएशन चे डॉ. रितेश अग्रवाल आणि अग्रवाल बहु महिला मंडळ व न्यू लाईफ ब्लड बँक परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हरिप्रसाद मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉक्टर अग्रवाल यांनी सर्वांना रक्तदानाविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले या रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे सर्वांना चालना मिळून अनेक जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमात प्रमुख डॉ.राधा अग्रवाल, डॉ.रुपेश परसावत, डॉ. संकेत अग्रवाल न्यू लाईफ ब्लड बँक चेअरमन डॉ. पंकज खेडकर उपस्थित होते


