परभणी (प्रतिनिधी) दि.2 ऑक्टोबर रोजी बाल विद्यामंदिर हायस्कूल, वैभव नगर शाखेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती वर्ग 7 वा (H) या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वतीने वर्गशिक्षिका सौ.गुडेवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे विभाग प्रमुख पी. व्ही. रुघे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधू परदेशी व लालबहादूर शास्त्री यांच्या भूमिकेत चि. विहान झांबरे उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध सुंदर भित्तिपत्रकांचे विमोचन करण्यात आले. चि. सर्वेश जोशी, श्रीयश यादव,आयुष हनुमंते, आदित्य भोसले,कु. पूर्वी काळे, सिद्धी मोरे, सोनम मोरे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून दोन्ही विभूतींच्या जीवनावर प्रकाश टाकला. कु. मनश्री गमे या विद्यार्थिनीने स्वहस्ते महात्मा गांधीजींचे सुंदर रेखाटन केले.
अध्यक्षीय समारोपातून पी.व्ही.रुघे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कु. समृद्धी खेडकर व चि. आशिष खूपसे यांनी सूत्रसंचलन केले तर चि. शुभम भरोसे या विद्यार्थ्याने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्यामुळे वर्गशिक्षिका श्रीमती भावना गुडेवार व संचलन करणाऱ्या विदयार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले .याप्रसंगी सर्व विद्यार्थी आणि प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक उपस्थित होते.


