परभणी,( प्रतिनिधी) आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अत्याधुनिक सौंदर्यशास्त्र, केसशास्त्र व लेसर विभाग सुरू झाला आहे. या विभागामुळे परभणी शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना अती उच्च दर्जाचे त्वचा, केस आणि सौंदर्य उपचार आता स्थानिक पातळीवरच अत्यल्प दरात उपलब्ध होत आहेत.
या विभागात प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. यात प्रमुख म्हणून डॉ. मनीष कदम आणि डॉ.दिनेश भूतडा व डॉ.रेवती राज हे कार्यरत आहेत.या विभागात केमीकल पीलिंग व मायक्रोडर्म अब्रेशन:- त्वचेच्या मृत कोशिका काढून टाकणे. मुरुमांचे डाग, काळे डाग, सुरकुत्या काढणे.पुव्हा थेरपी व क्रियो थेरपी,सोरायसिस, विटिलिगो (पांढरे डाग) यांसारख्या रोगांसाठी प्रभावी.क्रायो थेरपी : वेदनाशून्य त्वचेवरील मस काढणे,डायोड लेसर व योग लेसर,चेहरा टॅटू(गोंदण)काढणे, गरोदर स्त्रियामधील पोटावरील व चेहऱ्यावरील असमान रंग मिटविणे,कॅव्हिटेशन थेरपी ऑपरेशन न करता शरीरातील चरबी अल्ट्राव्हायोलेट कंपनाने कमी करणे,मेझो थेरपी केस गळती थांबवने, केस आणि त्वचेला पोषण देणे, हेअर स्कॅनिंग आणि हेयर लेसर :- अत्याधुनिक स्कॅनद्वारे केस गळतीची समस्या ओळखणे आणि उपाय योजना करणे. हेअर लेसर थेरपीद्वारे केस वाढवणे, केसगळती कमी करणे,हेअर ट्रान्सप्लांट :-टक्कल पडलेल्या पुरुष आणि स्त्रीयाचे केशरोपण करणे व कायमस्वरूपी उपाय, स्किन व्हाइटनिंग थेरपी:- त्वचा गोरी आणि चमकदार करणे. बायोलाइट थेरपी मध्ये प्रकाशद्वारे सुरकुत्या कमी करून, त्वचेला तरुणपणा आणणे.या सुवीधेचा रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन आर.पी. हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.राहुल पाटील, सचिव डॉ.सौ.संप्रिया पाटील व अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांनी केले आहे.


