परभणी,(प्रतिनिधी) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा उमेदवारी अर्ज आज शिवसेनेचे मंत्री तथा प्रवक्ते संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना सईद खान हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचे डिपॉझिट जप्त करतील, असा दावा शिवसेनेचे मंत्री तथा प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केला.
महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सईद खान यांनी सोमवारी (दि.01) जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे नेते मंत्री शिरसाठ, राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार संतोष बांगर, माजी आमदार सुरेश वरपुडकर, विधान परिषद सदस्य हेमंत पाटील, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी खासदार सुरेश जाधव, नगराध्यक्ष मिलींद सावंत, राजू कापसे, माणिकराव पौंढे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, आप्पाराव वावरे यांच्यासह शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
यावेळी शिरसाठ यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना सईद खान यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ते महायुतीचे उमेदवार असतील. महायुतीतील भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना शिंदे गटाचे भक्कम असे समर्थन सईद खान यांच्या पाठीशी असेल, त्यामुळेच ते निश्चितच विजयी होतील, नव्हे प्रतिस्पर्ध्यांचे, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करतील, असा विश्वास व्यक्त केला.
सिरसाठ यांनी जी काही मंडळी नाराज असतील, त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे नमूद करतेवेळी महायुतीत सईद खान यांच्या उमेदवारी संदर्भात कोणतेही हेवे दावे नाहीत. सर्वानुमते महायुतीने सईद खान यांची उमेदवारी निश्चित केली आहे. या मतदारसंघात महायुतीचे भक्कम असे संख्याबळ आहे. त्यामुळे ते त्या संख्याबळाच्या जोरावर निवडून येतीलच, असा विश्वास सिरसाठ यांनी व्यक्त केला. आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आलो आहोत. सईद खान यांच्या विजयाच्या जल्लोषातसुध्दा निश्चित सहभागी होऊ असे ते म्हणाले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


