परभणी,(प्रतिनिधी) : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांनी सोमवारी (दि.01) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, महानगर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, महापौर सय्यद इकबाल, सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. विवेक नावंदर यांनी उमेदवारीची संधी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मतदारसंघातील मान्यवरांचे आभार मानले. परभणी-हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी तसेच शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेचा विश्वास, आशीर्वाद आणि सहकार्याच्या बळावर ही निवडणूक यशस्वी करू. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. नावंदर यांच्या उमेदवारीमुळे परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


