परभणी |(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने आज शहरातील सिटी पॅलेस येथे “मोदी सरकारची १२ वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण” अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मराठवाडा संयोजक श्री. नितीन काळे व युवा नेते श्री. राहुल लोणीकर यांची उपस्थिती होती. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भुमरे, गटनेते श्री. मुकिंद खिल्लारे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश देशमुख, नगरसेवक डॉ. केदार खटिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. भागवत कराड, श्री. नितीन काळे व श्री. राहुल लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच २५ जून रोजी “आपत्काल के ५१ साल” या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामध्ये विकसित भारत संकल्प संमेलन, विशेष जनसंपर्क अभियान, प्रगती पथ यात्रा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तसेच पत्रकार परिषद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हास्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. भागवत कराड यांनी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, जनकल्याणकारी योजना तसेच आगामी कार्यक्रमांची माहिती पत्रकारांना दिली.
बैठकीस भाजपा महानगर व ग्रामीणचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


