परभणी, (प्रतिनिधी) युवा सेनेच्या वतीने राज्यस्तरीय ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, युवकांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 7 जून रोजी सकाळी 11 वाजता पाथरी रस्त्यावरील परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी हॉस्पिटल येथे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे अशी माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
स्पर्धेमध्ये 18 ते 35 वयोगटातील विद्यार्थी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांना सहभागाची संधी देण्यात आली आहे.
स्पर्धा विभागीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा टप्प्यांत पार पडणार आहे. विभागीय केंद्रांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि कोल्हापूर नांदेड या ठिकाणांचा समावेश आहे.
स्पर्धेच्या तारखांनुसार 7 जून रोजी जिल्हास्तरीय,१० जून रोजी विभागीय आणि १४ जून रोजी राज्यस्तरीय फेरी आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेतून तीन विजेते निवडले जाणार आहेत. विभागीय स्पर्धेतून प्रत्येक विभागातून दोन स्पर्धक असे एकूण राज्यस्तरीसाठी 16 स्पर्धक निवडले जाणार आहेत.
18 ते 35 या वयोगटात ही स्पर्धा होणार आहे.
जिल्हास्तरीय
स्पर्धेसाठी
1)‘Vision Maharashtra 2050
2)‘राजकारण आणि समाजकारण : युवकांची भूमिका’
हे विषय ठेवण्यात आले आहे.
विभागीय स्पर्धेसाठी
‘माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी’, एकविसाव्या शतकातील मराठी अस्मिता आणि आव्हाने आणि संधी
तर अंतिम राज्यस्तरीय फेरीत ‘महाराष्ट्र धर्म : काय जपलं पाहिजे, काय बदललं पाहिजे?’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.
स्पर्ध्येसंदर्भात अधिक माहितीसाठी मकरंद कुलकर्णी 9860918163 व राहुल गायकवाड 7798472404 यांच्याशी संपर्क साधावा.


