सेलू,(प्रतिनिधी) : तालुक्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी धडक कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण 3 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दूधना नदीपात्रातून शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी सुमारे 9 वाजता शहरातील समर्थ जिनिंग परिसरात सापळा रचून संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान गोविंद शेवाळे यांच्या मालकीचा विनानंबर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि त्यामधील वाळू असा एकूण 3 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, विलास सातपूते, विष्णू चव्हाण, उमेश चव्हाण आणि मधुकर ढवळे यांच्या पथकाने केली.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


