परभणी,(प्रतिनिधी) : परभणी ते मानवत या रस्त्यावरील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील मंदिराचा गाभारा कोसळून काही भाविक दगावले आहेत. तर अन्य काही भावीक जखमी झाले आहेत. मृत्यूचा आकडा अद्याप समोर नसून आला नसून अनेक जण ढिकाऱ्याखाली गाडले गेले असल्याचे शक्यता आहे
या मंदिराच्या गाभार्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. या गाभार्याच्या बांधकामात दगडांचा वापर होत होता. आज शनिवार रोजी या मंदिरात भाविकांची दर्शनाकरीता मोठी गर्दी उसळली. त्यावेळी गाभार्याचा काहीसा भाग विशेषतः दगड कोसळून काही भावीक दबून मृत्यू पावले. मृत्यू पावलेल्या भाविकांची संख्या चार किंवा त्यापेक्षा अधिक असावी असा अंदाज आहे. अधिक तपशील कळू शकला नाही. बचाव कार्य युद्ध पातळीवर चालू असून उपस्थित भाविकांनी लगेच ढिगारात अडकलेले लोक बाहेर काढायला सुरुवात केली आहे


