परभणी,(प्रतिनिधी) : परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी 465 पैकी पहिल्या पसंती क्रमांकाचे सर्वाधिक 242 मते मिळवून विजय पटकाविला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 22 जून रोजी सकाळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व निरीक्षक रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यावेळी निवडणूक रिंगणातील प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजण्यात आली. त्यात एकूण 465 मतापैकी पहिल्या पसंती क्रमांकाचे सर्वाधिक म्हणजे 242 मते महायुतीचे उमेदवार खान यांनी पटकावले त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांना 159 म्हणजे दुसर्या क्रमांकाचे तर अपक्ष उमेदवार सुशिलभैय्या देशमुख यांना 56 मते मिळाली. ते तीसर्या क्रमांकावर राहिले. एकूण मतदानात 8 मते बाद झाली.


