परभणी : पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीने परभणीचे मा. पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत. तसेच आता तर लोकप्रतिनिधीही पत्रकारांना धमक्या देत आहेत. ही लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना त्यांना शिवीगाळ केली तसेच असभ्य भाषेत बोलून धमकी दिली आहे. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर लोकप्रतिनिधीच जर अशा प्रकारे वागत असतील तर ही निंदनिय बाब आहे. खा. संजय दिना पाटील यांच्या प्रकारानंतर राज्यभरातील पत्रकारांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन खा. संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रभू दिपके, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार हट्टेकर,कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, कोषाध्यक्ष मोईन खान,उपाध्यक्ष विठ्ठलराव वडकुते,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे,प्रसिध्दी प्रमुख सुधाकर श्रीखंडे,प्रकाश साळवे, अशोक पवार लक्ष्मीकांत बनसोडे,शिवशंकर सोनुने, धाराजी भुसारे, मोहसीन खान शिवाजी वाकोडे,संघपाल आढागळे,मंदार कुलकर्णी, पांडुरंग अभुरे,अनिल दाभाडकर,अरुण रणखांबे, सुनिल सुतारे, दिलीप बोरकर, संजय घनसावंत आदी उपस्थित होते.


