परभणी, (प्रतिनिधी,)राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार सतीश रेड्डी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, सहायक महसूल अधिकारी आबेदखॉ पठाण, सहायक महसूल अधिकारी सुरेश पुंड, महसूल सहाय्यक विश्वनाथ कनके तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***


