परभणी (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवार दिनांक 28 जून रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजता जाहीर सभा होत आहे.
‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्या त्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे शिवसेनिकांना बळ देत आहेत.
उद्धव ठाकरे हे हिंगोली येथून परभणीत शनिवारी सायंकाळी मुक्कामी येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 28 जून रोजी सकाळी 10 वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे जाहीर सभा होत आहे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार संजय जाधव यांनी ‘ऑपरेशन टायगर’मध्ये बंडखोरी केल्यानंतर मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः परभणीत येऊन शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या दौऱ्यातून उद्धव ठाकरे बंडखोरांना थेट आव्हान देणार असून, निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
जास्तीत जास्त संख्येने निष्ठावंतांनी उपस्थित रहावे असे आव्हान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले आहे.


