परभणी (प्रतिनिधी) जनतेचे शिवसेनेवर मोठी प्रेम आहे यातूनच हा मतदारसंघ सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला असताना निवडून आलेले लोकप्रतिनिधी गद्दर होण्याची परंपरा लागली आहे मात्र आता गद्दारांना काढून टाकण्यासाठी महात्मा फुले यांचा आसूड कार्यकर्त्यांना चालवावा लागणार आहे असे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले
अक्षदा मंगल कार्यालयात निष्ठावंतांच्या मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांनी शिवसेनेची बंडखोरी केलेल्या सहा खासदारांवर कडाडून टीका केली. शिवसेनेमुळेच दोन पत्र्याच्या खोलीतून हजारो कोटींचे मालक झालेल्या झालेल्यांना केवळ स्वार्थ जडला आहे. मात्र जनताच त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना खा. संजय जाधव यांच्याकडे निर्देश केला. देशात भाजप ने सुरू केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी कडाडून टीका केली. अंतर्गत गटबाजी ही शिवसेनेत नसून भाजपमध्येच मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे नमूद करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ नयेत, यासाठी त्यांची पंख छाटण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले.

या देशात घटनेतील तरतुदींना मोठे महत्त्व असून सहा खासदारांनी केलेला गट हा घटनात्मक दृष्ट्या योग्य ठरू शकत नाही. त्यामुळे घटनेच्या आधारे लोकसभेच्या अध्यक्षांनी या सहाही खासदारांना बाद ठेवण्याची बाद ठरवण्याची प्रक्रिया करावी अन्यथा या देशात कायदा पाळला जात नाही असेच म्हणावे लागेल, असेही पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले. या 6 खासदारांनी बाळासाहेब यांच्या विचारांशी घात केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आपल्याला खासदार जाधव व आ. डॉ. राहुल पाटील यांच्यावर मोठा विश्वास होता . मात्र वाघ समजणारा बंडू जाधव हा केवळ वाघाचे कातड पांघरूण असल्याने तो पळून गेला असाही टोला पक्षप्रमुख ठाकरे यांनी लगावला .जनतेच्या विकासाच्या नावाखाली स्वतःच्या खाजगी निधीसाठी विचारांशी गद्दारी करणारे हे गाढव प्रायव्हेट विमानात दलालांसोबत फिरत होते. हे जनतेचा काय विचार करणार असे म्हणताना सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न असताना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही. हे सरकार आर्थिक दृष्ट्या कंगाल होऊ लागले असून येत्या दोन-तीन महिन्यातच राज्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे मोडलेली दिसून येईल. असेही ठाकरे म्हणाले
भाजपवर टीका करताना जो भाजप दोन लोकप्रतिनिधींवर होता मात्र आमच्या सोबत येऊन यश मिळाल्यानंतर आम्हालाच मूठमाती दिली. त्याचवेळी आम्ही त्यांच्यापासून मोकळे होण्याची गरज होती. रामाच्या नावावर मते मागून दुकान चालविणारी ही मंडळी आता तेथेही भ्रष्टाचार करून बाबरांची पार्टी झाली आहे.या अशा पार्टीला गद्दर पाठिंबा देत आहेत. गदरांना गद्दारीची लागलेली ही कीड परभणीचा दुर्दैवी इतिहास आहे. मात्र त्याचबरोबर तो महाराष्ट्राचा देखील अपमान आहे. त्यामुळे या गदारांना गाडण्याचे काम जनतेलाच कराव लागणार आहे,असे आवाहनही पक्षप्रमुख ठाकरे यांनी केले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनेक पांडू पांडू बंडू आले आणि गेले मात्र शिवसेनेला काहीही फरक पडलेला नाही. आता ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन प्रभू श्रीरामाचे सुरू झाले आहे. राम मंदिराच्या पेट्या पळवून कोट्यावधी रुपये हस्तगत करण्याचे काम भाजपने केले आहे. अशांना आपले गद्दार साथ देत आहेत. त्यामुळे अशा गद्दारांना दिसली की तुडवा, त्यासाठी कोणत्याही आदेशाची वाट पाहू नका, असे आवाहन केले.
आ. डॉ. राहुल पाटील यांनी प्रास्ताविकात खासदार जाधव यांच्यावर कडाडून टीका करीत प्रत्येक निवडणुकीतच आपल्याला पडद्यामागून पाडण्यासाठी कार्य राहणारे खासदार जाधव स्वार्थासाठी पळून गेले. मात्र आपल्या विरोधात व कार्यकर्त्यांवर कोणी अंगावर आले तर शिंगावर घेऊ असाही इशारा त्यांनी दिला. व्यासपीठावर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, अंबादास दानवे, महापौर सय्यद इकबाल, डॉ विवेक नावंदर, कल्याण रेंगे पाटील ,माजी आमदार मीराताई रेंगे पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


