परभणी, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात रविवारी (दि. २८ जून) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे.
‘दोन थेंब पोलिओचे, आरोग्याच्या सुरक्षेचे’ या ब्रीदवाक्यानुसार सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना २८ जून रोजी जवळच्या पोलिओ बुथवर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
या मोहिमेसाठी जिल्हाभर १,६२३ पोलिओ बुथ उभारण्यात आले असून २ लाख १९ हजार ८४५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाची सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
***


