परभणी,(प्रतिनिधी) : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा काळे, झाडगाव आणि उखळद येथे अवैध देशी दारू विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली. या कारवाईत चार आरोपींविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा काळे येथे आरोपी प्रकाश ग्यानु जाधव याच्याकडून मंगळवारी अवैध देशी दारूच्या 50 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शरद डोंबे करीत आहेत. दुसर्या कारवाईत झाडगाव येथील आरोपी प्रल्हाद बाबुराव सूर्यवंशी (देशमुख) याच्याकडून अवैध देशी दारूच्या 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलीस कर्मचारी नामदेव सुजलोड यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागेश पोते करीत आहेत.
उखळद येथे करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये आरोपी प्रसाद बळीराजा हेंडगे याच्याकडून 12 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस कर्मचारी भगवान चोरघडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रणेर करीत आहेत. तसेच उखळद येथीलच आरोपी तुकाराम उत्तमराव बोकार याच्याकडून 11 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरुद्धही ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पवार करीत आहेत.
ही कारवाई ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, राहुल वडमारे, नामदेव सुजलोड, अतुल टेहरे, नागेश पोते, अमोल जाधव, विजय चव्हाण, संजय चाटे आणि शरद डोंबे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध देशी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून अवैध व्यवसायाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
Monday, July 13
ताज्या बातम्या:
- शांताबाई बोरुळ यांचे निधन
- दिल्लीतील भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी
- जून महिन्यात रेल्वे सुरक्षा बलाची दमदार कामगिरी : हरविलेली मालमत्ता परत, चोरट्यांवर कारवाई; सामान चोरणार्या टोळीला अटक
- मतदार यादी सखोल पुनरीक्षण जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची साथ महत्त्वाची – तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
- डॉ. अतुल मोहोड यांची पंजाब मधील राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालक पदी निवड
- सकल धनगर समाजाचा गंगाखेडात मोठा मोर्चा : महेश बीडगर मारहाण प्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी
- परभणी जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला वेग ; नागरिकांनो बीएलओंना सहकार्य करा* *गणना फॉर्म वेळेत भरून जमा करा – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण


