फळपिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ*
परभणी दि. 06 (जिमाका) : शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पिक विमा नोंदणी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दौलत चव्हाण यांनी केले आहे.
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (मृग बहार) सन २०२६-२७ अंतर्गत संत्रा, द्राक्ष, पेरू, लिंबू, हळद, मोसंबी व चिकू या अधिसूचित पिकांसाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत संपली होती. मात्र, पिक विमा नोंदणीचे पोर्टल विलंबाने सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र शासनाने या पिकांसाठी अर्ज करण्यास दि. १४ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या मुदतवाढीचा लाभ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी घेऊ शकतात. संबंधित शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पिक विमा नोंदणी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दौलत चव्हाण यांनी केले आहे.


