परभणी ( प्रतिनिधी)परभणी-हिंगोली विधान परिषदेचे आमदार सईद खान यांचे वडील तथा पाथरी येथील ज्येष्ठ नागरिक शेरगुल खान यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
शेरगुल खान हे अत्यंत साधी राहणी, शांत स्वभाव, सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते.
दरम्यान त्यांच्यावर उद्या (रविवार) दुपारी 2 वाजता पाथरीत मुस्लिम धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शेरगुल खान यांच्या पश्चात पाथरीचे नगराध्यक्ष आसिफ खान, विधान परिषदेचे आमदार सईद खान, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मेहराज खान, तसेच तीन मुले, सुना, नातवंडे आणि असा मोठा परिवार आहे. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


