मानवत (प्रतिनिधी) शासनाच्या वतीने मानवत येथील रेणुका मंगल कार्यालयात बुधवारी (ता. २२) आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरात मानवत तालुका पत्रकार संघाच्या वतीने मतदारयादी विशेष सखोल फेरतपासणी (Special Intensive Revision – SIR) संदर्भात जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी मतदार नोंदणीसाठीचे अर्ज बीएलओ संदीप काळे यांच्याकडे सुपूर्द केले. मतदारयादी विशेष सखोल फेरतपासणी (SIR) मोहिमेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि पात्र मतदारांनी नाव नोंदणी व आवश्यक दुरुस्ती वेळेत करून घ्यावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या शिबिरास पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यासह मानवत, पाथरी व सोनपेठ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी, संजय नाईक, शाम झाडगावकर, गोपाळ लाड, दिगंबर बाकळे आणि सचिन मगर उपस्थित होते. पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.


