परभणी,(प्रतिनिधी) : परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 लाख रुपयांच्या कथित जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत छडा लावत हा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचे उघड केले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल असा सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परतूर येथील दहिवाल ज्वेलर्समध्ये काम करणारा प्रथमेश शहाणे याने बुधवारी (दि. 22) परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुकानमालकाने बँकेत जमा करण्यासाठी दिलेली 7 लाख रुपयांची रक्कम घेऊन तो परभणीकडे येत असताना जळगाव परिसरात चार अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून रक्कम लुटल्याचा दावा त्याने केला होता. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि घटनास्थळावरील तपासादरम्यान फिर्यादीने साथीदारांच्या मदतीने जबरी चोरीचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले.
तपासात इमरान शेख सत्कार शेख (रा. सातोना, ता. परतूर) याच्यासह तीन जणांचा सहभाग उघड झाला. इमरान शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल असा एकूण सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उर्वरित आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, गणेश सवंडकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
Monday, July 27
ताज्या बातम्या:
- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
- बेपत्ता तरुणीची माहिती देण्याचे आवाहन
- आर.पी. हॉस्पिटलकडून मोफत बस
- माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
- राष्ट्रभक्ती शिस्तबद्ध आचरणातूनच दिसली पाहिजे : जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत : मराठवाडा हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त देशभक्ती आणि लोकशाही मूल्यांचा जागर
- सेलूत 35 दिव्यांग लाभार्थ्यांना रेल्वे पासचे वितरण; संघर्ष दिव्यांग संघटनेचा पुढाकार
- स्वच्छ सर्वेक्षण -२०२६; परभणी जिल्ह्याला उत्कृष्ट स्थान मिळण्यासाठी स्वच्छता निकषांची अंमलबजावणी करावी – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
- विश्व हिंदू परिषदेच्या गोपाळ दिंडीने वेधले लक्ष : हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


