सेलू,(प्रतिनिधी) : सेलू नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अन्वर खान दिलावर खान पठाण यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. ‘तडवी भिल्ल’ या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वस्तुस्थिती लपवून आणि लबाडीने प्राप्त केल्याचे नमूद करत समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23, सन 2001 मधील कलम 7(6) अन्वये समितीसमोर झालेल्या कार्यवाहीच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. समितीने दि. 22 जुलै 2026 रोजी यासंदर्भातील लेखी आदेश जारी केला. समितीच्या आदेशावर संशोधन अधिकारी तथा सदस्य सुजाता गायकवाड, उपसंचालक तथा सदस्य सचिव सुरेश रामटेके आणि सहआयुक्त तथा उपाध्यक्ष सुरेश वानखेडे यांच्या स्वाक्षर्या असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या या निर्णयामुळे सेलू शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवकपदाबाबत पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया काय होणार, याकडे आता नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Tuesday, September 15
ताज्या बातम्या:
- शुभम मस्केची सुरेल भरारी; ‘सा रे ग म प’मध्ये परभणीच्या युवा गायकाची टॉप-१२ मध्ये धडक
- कै. प्रा. शंकर गंधम सर स्मृती राज्य रस्सीखेच स्पर्धा उत्साहात संपन्न; लातूर, ठाणे, बुलढाणा व मुंबई ,नांदेड़ जिल्हा अव्वल स्थानी
- डॉ. संदीप चव्हाण यांची ग्राहक संरक्षण परिषदेत अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती
- जी-1 हॉस्पिटल येथे दि 29 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
- वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
- आनंदराव भरोसे यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्याच्या सभामंडपाचे भूमिपूजन
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर


