परभणी,(प्रतिनिधी) : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांशी संबंधित 20 हून अधिक तंत्रज्ञांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेत प्रवेश केला.
आमदार डॉ. राहुल पाटील हे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे कार्याध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची राज्यभर संघटनात्मक बांधणी वेगाने सुरू आहे. विविध कर्मचारी संघटनांतील अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या संघटनेत सहभागी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रवेश कार्यक्रमात आमदार डॉ. राहुल पाटील यांनी नव्याने प्रवेश करणार्या तंत्रज्ञांचे स्वागत केले. वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांवर होणार्या अन्यायाविरुद्ध तसेच त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेक तंत्रज्ञांनी संघटनेत प्रवेश केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी राजेश डुब्बे, दत्ता जाधव, संतोष लोखंडे, संतोष बर्वे, विशाल जाधव, प्रसाद सिंगणापूरकर, मुख्य संघटक जीवन मुगळीकर, रमाकांत गायकवाड, अभिजीत कुलकर्णी, के. डी. धर्माधिकारी यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tuesday, August 4
ताज्या बातम्या:
- परभणीच्या. गोल्ड मेडलिस्ट यासीन खान मुजफ्फर खानची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सुवर्ण कामगिरी
- 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण; हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी विविध विभागांना सूचना
- नांदेड रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; एका दिवसात 1,087 प्रकरणे, सुमारे सहा लाखांचा दंड वसूल : 29 गाड्यांची तपासणी
- दर्गा रोड परिसरातून पाच गायींसह वासरू चोरट्यांनी केले लंपास : कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
- अवघ्या सहा तासांत घरफोडीचा छडा; दोन सराईत चोरटे जेरबंद : पिंगळीतील 2 लाख 9 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत; ताडकळस पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत 20 हून अधिक तंत्रज्ञांचा वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेत प्रवेश
- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
- बेपत्ता तरुणीची माहिती देण्याचे आवाहन


