परभणी, (प्रतिनिधी) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक रामेश्वर मुंडे यांच्या हस्ते समाज कल्याण कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी कार्यालय तसेच कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय वसतिगृहे आणि चार शासकीय निवासी शाळांमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी कल्याण, स्वच्छता, आरोग्य तपासणी तसेच विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले.
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, स्वच्छता, आरोग्य आणि जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला आहे. शासनाच्या सेवा-सुविधा अधिक परिणामकारकपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी सांगितले. ध्वजारोहणासह ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आयोजित विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अधिनस्त शासकीय वसतिगृह व निवासी शाळांमधील संबंधितांनी परिश्रम घेतले.
*-*-*-*-*-*


