परभणी, (प्रतिनिधि) शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे हे रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी टाकळी कुंभकर्ण, ता. परभणी येथे सकाळी १० वाजता दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.
परभणी सह संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आहे.खरीप हंगामातील पिके नष्ट झाली आहेत. जनावरांच्या चारा पाण्याचा देखील प्रश्न गंभीर झाला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर येत आहेत रविवारी सकाळी दहा वाजता परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण शिवारात आदित्य ठाकरे हे पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यात शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क नेते आमदार अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत.
आदित्य ठाकरे हे टाकळी येथून दुपारी १२ वाजता वरफळ, ता. परतूर, जि. जालना येथेही ते दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परभणी लोकसभा संपर्क प्रमुख प्रदीपकुमार खोपडे व आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे.


