परभणी (प्रतिनिधी) येथील भारतीय आयुर्विमा महामंडळातील विकास अधिकारी रमेश जाधवर यांचे सोमवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली,जावई असा मोठा परिवार आहे.
अत्यंत शांत, मितभाषी व उत्तम संघटक असणारे जाधव हे एक लोकप्रिय विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते, लायन्स क्लब अनेक सामाजिक संघटनांशी ते संलग्न होते.
दरम्यान जाधवर यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


