परभणी,(प्रतिनिधी) : संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या दुष्काळ व संबंधित सोयी-सुविधांबाबतच्या अध्यादेशाच्या प्रतीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.28) तहसील कार्यालयासमोर होळी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.
तहसील कार्यालयासमोर सकाळी झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे नेते डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, शिवलिंग बोधने, सदाशिवराव देशमुख, अरविंद देशमुख, नवनीत पाचपोर, अनिल डहाळे, संभानाथ काळे, बाळासाहेब तळेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत अध्यादेशाच्या प्रती जाळल्या. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि ग्रामीण भागाला आवश्यक मदत व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


