वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने पुरस्कृत उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदार संघातील नेत्यांनी शहराच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना मुलभूत सुविधासाठी आंदोलने करावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे असे प्रतिपादन असे प्रतिपादन वंचीत बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार शेख नासेर शरीफ यांनी दि. 04 नोव्हेबर 2024 रोजी साय. 6.00 वा. हॉटेल सिटी पॅलेस येथील पत्रकार परिषदेत केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शहरातील रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याला सत्ताधारी नेतेमंडळी जबाबदार आहेत. शहरात रस्ते नाल्या, गटारे , स्वच्छता आदी सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. जिल्ह्यात उर्दु शाळा होत्या त्याही बंद झाल्यात. मुस्लीम समाजाची मते हवी त्यांच्या विकासाकडे लक्ष कुणीच दिले नाही.
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने शहरातील वस्त्यामध्ये विकास कामासाठी 9.55 लाखाचा निधी आणला होता. तो शहरजिल्हाध्यक्ष यांच्या मनमानी कारभारामुळे रद्द करण्यात आला. प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर विकास निधी रद्द करण्यात आला ही आश्चर्याची बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजीज पवार गट) च्या शहर जिल्हाध्यक्ष यांच्या मनमनीला कंटाळून पक्ष सोडले. तसेच ज्या महारांजानी प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्ध वापरले त्यांना हे सरकार पाठीशी घालून संरक्षण देण्याची घोषणा करतात अशा पक्षात राहणे यापुढे शक्य नाही. समाजात काम करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे पक्ष सोडून वंचीत बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करून परभणी विधानसभा मतदार संघातून उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात आहे असे त्यानी सांगितले.
यावेळी प्रा.नागोराव पांचाळ (राज्य उपाध्यक्ष), डॉ. सुरेश शेळके (विभागीय प्रशिक्षक)डॉ. धर्मराज चव्हाण (विभागीय प्रवक्ते)तुकाराम भारती जिल्हाध्यक्ष,शेख महेबुब पिंजारी, सुनिता साळवे महिला जिल्हाध्यक्षा,युसुफ कलीम जिल्हासचिव,सुमीत जाधव,विश्वजीत वाघमारे, अशोक वायवळ, अविनाश सावंत,शेख इरशाद पिंजारी,प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.


