परभणी (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे परभणी विधानसभेतील उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे सोमवारी एका पत्राद्वारे त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांना शिवसेना शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून यंदा विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आले. 2014 प्रमाणे यावेळेसही आनंद भरोसे यांची थेट लढत महाविकास आघाडी तथा उबाठा गटाचे डॉ.राहुल पाटील यांच्याशी होणार आहे. दरम्यान आनंद भरोसे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली असून त्यांच्या प्रचाराची पूर्ण धुरा प्रचार प्रमुख म्हणून राजू कापसे यांना देण्यात आली आहे.



