पालम (प्रतिनिधी) दिनांक 6 रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती पालम येथे गणेशराव रोकडे दादा (संचालक जि. म.सह बँक परभणी) यांच्या अध्यक्षते खाली पालम तालुक्यातील सर्व चेअरमन संघटनेची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये सर्वानुमते चेअरमन संघटना पालम तालुका अध्यक्षपदी मोतीराम रावसाहेव
खंडागळे यांची तर ओंकार साहेबराव ठाकूर (सावंगीथंडी) आणि भागवत दत्तराव कऱ्हाळे (खरब धानोरा)यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सचिवपदी शामराव दत्तराव काळे (गुंज)तर सहसचिवपदी कैलास बालासाहेब भागवत आणि कोषाध्यक्षपदी शिवाजीराव माधवराव उगिले (उमरा) यांची निवड करण्यात आली.
या सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व कार्यकारणी आणि सदस्य यांचा सत्कार मा. आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित सदस्य प्रभाकरराव यादवराव जाधव, शिवाजीराव भुजबळ, सीतारामजी चुडावेकर, सखारामजी बरडे, बबनराव शिंदे, किशनराव नळदुर्गे, बालासाहेब डांगे, धोंडीरामजी गायकवाड, गोविंदराव बंडगर, शिवाजीराव राऊत, पंडितराव जोरवर, सुभाष माने इत्यादी सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित
लक्ष्मणराव रोकडे अंकल (न.से.नगर पंचायत पालम) शिवाजीराव दिवटे गुरुजी (भाजपा प्र. कार्य. सदस्य), हनुमंतराव सोनटक्के (सरपंच पिपंळगाव (मु), डॉ.रामराव उंदरे (मा. सभापती कृ.उ. बाजार समिती पालम) गजानन रोकडे(सभापती कृ. उ.बा.स.पालम) भाऊसाहेब पौळ (उपसभापती कृ. उ.बा.स. पालम), नागनाथअप्पा खेडकर(चेअरमन) केशवराव धाडवे, श्री.बाळूकाका घोडेकर (चेअरमन) यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


