परभणी (प्रतिनिधी)परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आ. डॉ.राहुल पाटील, गंगाखेडचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या (9 नोव्हेंबर) शनिवार सायंकाळी 7वाजता येथील महात्मा फुले विद्यालय जिंतूर रोड परभणी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे
या सभेच्या तयारीच्या अनुषंगाने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस खा. संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. संजय जाधव म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणीत शनिवारी प्रचारासाठी सभेनिमित्त येणार आहेत. मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सभेसाठी उपस्थित राहून महाविकास आघाडीची आणि शिवसेना उबाठा गटाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले.सभेला हजारोंच्या संख्येने मतदार तथा विविध पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यासाठी महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाने सर्वसामान्यांना आवाहन करावे अशा सूचना केल्या
दरम्यान महात्मा फुले विद्यालय मैदानावर होणाऱ्या सभेसाठी शुक्रवारी स्टेज आणि आसन व्यवस्थेसह विविध प्रकारच्या उपाययोजना करणे सुरू होते. सभास्थळी जोरदार तयारी महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाच्या वतीने केली जात आहे. शुक्रवारी यंत्रणेच्या प्रमुख नेत्यांनी पाहणी केली.


